इंडिगोच्या विमानाला पक्षाची धडक, प्रवाशांसाठी केली दुसऱ्या विमानाची व्यवस्था

Indigo Plane

नवी दिल्ली : आज (२७ सप्टेंबर ) रोजी ‘इंडिगो’च्या दिल्लीला जाणाऱ्या विमानाला पक्षाने मुंबईजवळ धडक दिली. यानंतर तातडीने विमान मुंबई विमानतळावर परत उतरवण्यात आले. इंडिओने प्रवाशांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे.

विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर इंडिगोच्या अधिकाऱ्यांने सांगितले की त्यांनी प्रवाशांसाठी दुसर्‍या विमानाची व्यवस्था केली आहे. पहिले विमान रद्द केल्यामुळे मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांना दिल्लीला पोहचण्यासाठी विलंब झाला. प्रवाशांना दिल्लीला नेण्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे प्रवाशांनी कौतुक केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER