भाजपाच्या आमदारासह दोन नेते राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत; एकनाथ खडसे प्रभाव

मुंबई :  एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात एका आमदारासह भाजपाचे (BJP) दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये गेलेल्या काही आमदारांची घरवापसी होणार आहे, असे संकेत काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार (Ajit Pawar) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिले होते.

आणि आता काही आमदार आणि नेते हे परत राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भुसावळचे भाजपा आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांनी ११ डिसेंबर रोजी वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत भाजपाचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो गायब आहे.

मात्र, राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने संजय सावकारे हे खडसे यांच्यापाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीत होते. २००९ मध्ये एकनाथ खडसे यांच्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणूक लढवून जिंकले होते. आता एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय असलेले संजय सावकारे खडसे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER