कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती मिळण्याचे संकेत?

Agriculture laws on hold for 1.5 years

नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हस्तक्षेप करत, कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, केंद्र सरकार नरमले दिसते आहे.

दिल्ली येथून नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत दोन पावले मागे घेत, कृषी कायदे पुढील दीड वर्षांसाठी स्थगित करण्याची तयारी दर्शवली आहे. सरकारच्या याप्रस्तावावर आंदोलक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनीही चर्चेची तयारी दर्शवली आहे, असे कळते. याबाबत अजून सविस्तर माहिती मिळालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER