शिक्षकांच्या लोकल प्रवासाला मंजुरी मिळण्याचे संकेत

Mumbai Local train

मुंबई :- शिक्षक आणि शाळांच्या कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला पश्चिम आणि मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे, असे ट्विट पत्रकार राजेंद्र अकलेकर (Rajendra Aklekar) यांनी केले आहे.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, राज्य सरकारने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकलचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाची परवानगी मिळावी, यासाठी राज्य सरकारने रेल्वेला पत्र लिहिले आहे.

याआधी नवरात्रीनिमित्त मुंबई आणि एमएमआर भागातल्या महिलांना लोकलमधून प्रवास करण्याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढले होते. त्यावेळीदेखील रेल्वेने हात झटकल्याने वाद निर्माण झाला होता. तयारीशिवाय महिलांसाठी सेवा सुरू करण्यास रेल्वेने असमर्थता दर्शवली होती. केंद्राची परवानगी आणि तयारी करण्यासाठी वेळ लागेल असे सांगत लोकल सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला पत्राद्वारे कळवले होते.

शिक्षकांना लोकल प्रवासमुभा देण्याबाबत रेल्वे सकारात्मक आहे. बुधवारी दुपारी राज्य सरकारचे पत्र मिळाले. सक्षम प्राधिकृत स्तरावर संबंधित अधिकारी निर्णय घेतील आणि लवकरात लवकर मंजुरी दिली जाईल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER