भारताचा रस्ते बांधणीत विश्वविक्रम : गडकरी

Nitin Gadkari

नवी दिल्ली : सध्या देशातील रस्ते बांधकामांची कामे वेगाने सुरु आहेत. आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highways Authority of India) दिल्ली वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे चे काम करताना नवे विक्रम केले आहेत. या महामार्गाचे काम करताना सर्वाधिक प्रमाणात क्रॉँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. हे काम केवळ २४ तासांच्या कालावधीत करण्यात आले असून यामुळे दिल्ली वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वे ने ४ विश्वविक्रम मोडले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

देशासाठी पूर्वीपेक्षा वेगवान पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या प्रयत्नात आम्ही केवळ नवीन मापदंड स्थापित करत नाही तर जागतिक विक्रम मोडत असल्याचे गडकरींनी म्हटले आहे. हा महामार्ग निर्माण करण्यासाठी २४ तासांमध्ये पेव्हमेंट क्वॉलिटी क्रॉँक्रिटचा चा सर्वाधिक वापर केला गेला. त्याचबरोबर २४ तासांत पेव्हमेंट क्वॉलिटी क्राँक्रिटचे सर्वाधिक उत्पादन घेतल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.

दरम्यान, या कामगिरीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे अभिनंदन केले आहे. आपला देश आणि मुंबईसाठी ही मोठी कामगिरी असल्याचे फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER