शेतकरी आंदोलन : हा भारताचा अंतर्गत मुद्दा, यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार : सचिन तेंडुलकर

मुंबई : नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 70 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. काल (मंगळवारी) गायिका रिहानाने (Rihanna) शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. आता माजी पोर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांनंतर आता भारताचे महान क्रिकेटपूट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि ते भारतासाठी निर्णय घेऊ शकतात. आपण एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया.” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले आहे. सोबतच सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER