भारताची सलग विजयांची मालिका खंडीत, अफगाणचा विक्रम सुरक्षीत

India-Australia

ऑस्ट्रेलियाने (Australia) सिडनीतील (Sydney) टी-20 सामना जिंकून भारताच्या (India) सलग १० विजयांची मालिका खंडीत केली. यासह सर्वाधिक सलग विजयांच्या बाबतीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी राहिला आणि पहिली दोन स्थाने अफगिणस्तानकडे (Afganistan) सुरक्षीत राहिली. अफगणीस्तानने फेब्रुवारी २०१८ ते सप्टेंबर २०१९ दरम्यान सलग १२ सामने जिंकले होते. त्याआधीचा विक्रम ११ विजयांसह त्यांच्याच नावावर होता. अफगणिस्तानने मार्च २०१६ ते मार्च २०१७ दरम्यान हे ११ सामने जिंकले होते.

भारताने तिसऱ्या सामन्यातही कांगारूंना मात दिली असती तर अफगाणच्या त्या विक्रमाची तर बरोबरी झालीच असती, शिवाय ऑस्ट्रेलियाला टी२० मालिकेत केवळ तिसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला असता. याच्याआधी २०१६ मध्ये भारतानेच आणि २०१८ मध्ये पाकिस्तानने कांगारुंना क्लीन स्वीप दिला होता.

भारताने जे सलग १० सामने जिंकले आहेत त्यात विंडीजविरुध्द १, श्रीलंकेविरुध्द २, न्यूझीलंडविरुध्द ५ आणि ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या दोन विजयांचा समावेश आहे.

भारताचा सिडनीतील १२ धावांनी पराभव हा बरोब्बर एक वर्षाने झालेला पराभव आहे. याच्याआधीचा भारताचा शेवटचा टी-२० पराभव ८ डिसेंबर २०१९ रोजी विंडीजविरुध्द तिरुवनंतपुरम येथे होता आणि आता ८ डिसेंबरलाच आपण सामना गमावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER