युद्ध झाले तर तुमच्या भूमीत होईल! भारताचा चीनला संदेश

पूर्व लडाखमध्ये उतरवले रणगाडा रेजिमेंट

युद्ध झाले तर तुमच्या भूमीत होईल! भारताचा चीनला संदेश

लडाख : भारत आणि चीनमधील (India-China) तणाव रोज वाढतो आहे. भारत चीनच्या प्रत्येक कृतीला आक्रमक उत्तर देतो आहे. आता भारताने पूर्व लडाखमध्ये रणगाडा रेजिमेंट मैदानात उतरवून चीनला संदेश दिला आहे की, युद्ध झाले तर तुमच्या भूमीत होईल!

भारताने मैदानात उतरवलेल्या रणगाड्यांत भीष्म, अर्जुन व इतर अत्याधुनिक रणगाडे आहेत. हे रणगाडे कोणत्याही वातावरण – परिस्थितीत युद्धात उतरू शकतात. हा भाग सपाट आहे. त्यामुळे युद्धात रणगाडे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारताची ही कृती म्हणजे चीनला इशारा आहे की, युद्ध झाले तर तुमच्या हद्दीत घुसू. लडाख हा टेकड्यांचा प्रदेश आहे; पण स्थानिक सीमारेषेपलीकडे चीनच्या ताब्यात असलेला अक्साई चीन हा पठारी प्रदेश आहे. या भागात रणगाडे सहज धावतात. हा चीनला संदेश आहे, युद्ध झाले तर तुमच्या भूमीत होईल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER