भारताची धूळधाण, 36 धावातच बाद

Virat Kohli

अॕडिलेड कसोटीत आॕस्ट्रेलियन गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा अक्षरशः फडशा पाडला. भारतीय संघाचा डाव फक्त 36 धावातच आटोपला आणि पहिल्या डावाअखेरची आघाडी मिळून आता आॕस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 90 धावा कराव्या लागणार आहेत. भारताचा शेवटचा गडी मोहम्मद शामी याला कमिन्स चेंडू लागल्याने रिटायर व्हावे लागले आणि 1974 मधील भारताची सर्वात कमी धावसंख्या 42 पार करण्याच्या आशा मावळल्या.

हेझेलवूडने 5 षटकात 5 तर कमिन्सने चार गडी बाद केले. भारताच्या डावात एकही फलंदाज दोन आकडी धावा करु शकला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER