भारताची उंच भरारी, हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

hypersonic missile

नवी दिल्ली : देशात हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर (एचएसटीडीव्ही) तयार करण्यात भारताला यश आले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने ( डीआरडीओ) हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे.

या प्रकल्पाचे नेतृत्व डीआरडीओ प्रमुख जी सतीश रेड्डी आणि त्यांच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्र संघाने केले. सोमवारी सकाळी ११.०३ वाजता त्याचे प्रक्षेपण करण्यात आले. चाचणी प्रक्रिया सुमारे पाच मिनिटे चालली. चाचणी करताना हे लाँच व्हिकल कॅबशन चेंबर, एअर इन्टेक सेवन आणि कंट्रोल यासारख्या मापदंडांवर योग्य असल्याचे आढळले. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत आता येत्या पाच वर्षांत हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करू शकेल. या क्षेपणास्त्राचा वेग प्रति सेकंद दोन किलोमीटरपेक्षा जास्त असेल. डीआरडीओचे प्रमुख सतीश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हायपरसोनिक मिसाइल टीमने ही चाचणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER