भारताच्या पहिल्या महिला इंजिनिर… ए. ललिता

A Lalitha

आज घडीला स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचं योगदान आहे. पण एक काळ असा होता जेव्हा स्त्रिया फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टीत अडकलेल्या होत्या. स्त्रियांचा लग्न बालवयात होण्याचं प्रमाण जास्त होतं.

एवढ्या सगळ्या परिस्थितीवर मात करत स्त्रियांनी स्वतःला सिद्ध केलंय. अशाच एका कर्तृत्वानं महिलेची कहाणी आज जाणून घेणार आहोत. वयाच्या १५ व्या वर्षी लग्न झालं. १८व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला आणि त्यानंतर चार महिन्याने नवऱ्याचं निधन झालं. हि कहाणी आहे भारताच्या पहिल्या महिला अभियंता ए ललिता यांची.

मध्यमवर्गीय तेलगू परिवारात जन्माला आलेल्या ए ललितांचं घरही समाजापेक्षा वेगळं नव्हतं. सात भावंडांपैकी मुलांना इंजिनीयरींगचं शिक्षण घेण्यास परवानगी मिळाली तर दुसरीकडे मुलींना साधारण शिक्षणही पूर्ण करण्याची परवानगी मिळाली नाही. मुलींच्या लग्नाच्यावेळी त्यांचं शिक्षण आड यायला नको याच हिशोबाने मुलींना जास्त शिकवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ललिता यांनी फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेऊन शाळा सोडली.

१५व्या वर्षी ललितांचं लग्न करण्यात आलं आणि १८व्या वर्षी त्यांना एक मुलगी झाली. त्यानांतर ४ महिन्यातच नवऱ्याचं निधन झाल्याने, आता पुढे काय हा भविष्याचा मोठा विचार ललितांच्या समोर होता. मद्रासमध्ये तेव्हा सतीप्रथा बंद झालेली होती, पण एक विधवा स्त्री कडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदललेला नव्हता.

ललिता यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा शिकणाऱ्या स्त्रिया वैद्यकीय शिक्षणाकडे जात असायच्या. पण ललीत यांच्या मागे मुलीची जबाबदारी होती. अर्ध्या रात्री उठून जावं लागेल अशी नोकरी त्यांना नको होती. म्हणून त्यांनी आपल्या वडील आणि भावासारखं अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचं ठरवलं. ललितांचे वडील पप्पू सुब्बाराव, मद्रास विद्यालयातील इंजिनियरिंग कॉलेजचे प्राध्यापकी होते. त्यांनी प्राचार्य आणि इतर मान्यवरांशी यासंदर्भात बोलणं केलं. आणि इथे ललिता यांना प्रवेश मिळाला.

शेकडो मुलांमध्ये एका मुलीने शिकणं सोप्पी गोष्ट नव्हती. १९४० मध्ये ललिता यांचं अभियांत्रिकी शिक्षण सुरु झालं. यानंतर काही महिन्यांनी इथल्या हॉस्टेल मध्ये एकटं वाटत असल्याची तक्रार त्यांनी केली. कॉलेजमध्ये शिकण्यात काहीच अडचण नव्हती परंतु हॉस्टेलमध्ये त्यांना प्रचंड एकटेपण जाणवू लागलं होतं. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी इतर मुलींना इंजिनियरिंगचं शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलं आणि लवकरच लिलम्मा आन इ थ्रेसीया या दोन मुलींनी सिव्हिल इंजिनियरिंग साठी महाविद्यालयात प्रवेश घेतला. या दोन्ही मुली ललितांना जुनियर असल्या तरीही त्यांनी ललिता यांच्या सोबतच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याकाळी दुसऱ्या महायुद्धामुळे जग हादरलं होतं. त्यामुळे इंजिनियरिंग महाविद्यालयाचा अभ्यासक्रम लवकर पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

इंजिनियरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिमलामधल्या स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशन आणि सोबतच आपल्याया वडिलांसोबत काम केलं. कॉलेजमध्ये डिग्री मिळतानाचा अनुभव पण वेगळा होता. प्रमाणपत्रावर आधीपासून असलेला HE शब्द खोदून कॉलेजला तिथे SHE असा पहिल्यांदा उल्ल्लेख करावा लागला होता.

त्यांच्या वडिलांनी जेलेक्ट्रोमोनीयम या एका विद्युत संगीत वाद्याचा आणि इलेकट्रीक फ्लेम प्रोड्युसर धूर विरहित चुल्याचा शोध लावला. या कामात ललिता आपल्या वडिलांना मदत करत असत. वडिलांसोबत ९ महिने काम केल्यानंतर ललिता यांनी अजून नव्या संधी शोधण्याचा प्रयत्न केला. लवकरच त्यांना कोलकात्याला असोसिएटेड इलेकट्रीकल इंडस्ट्रीजमध्ये काम मिळालं. काहीच वंशात ललिता यांच्या कामाचं जागतिक स्तरावरही कौतुक होऊ लागलं. त्यांच्या उत्कृष्ट काम्मुलेच त्यांना १९६४ला न्यूयॉर्कमध्ये झालेल्या महिला अभियंता आणि वैज्ञानिकांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला आमंत्रित करण्यात आलं होतं.

काम करत असतानाही आपल्या संपूर्ण करियरमध्ये त्यांनी कधीच आपल्या मुलीकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. त्यांनी मुलीला चांगलं शिक्षण दिलं आणि इथली पुरुषप्रधान संस्कृती मुलीच्या कुठल्याच गोष्टीच्या आड येणार नाही याची काळजी घेतली.

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी निडरपणे सांगितलं होतं की, “माझा जन्म जर १५० वर्ष आधी झाला असता तर मला नवर्यासोबतच त्याच्या चिंतेत जळावं लागलं असतं.

वयाच्या अवघ्या ६०व्या वर्षी ए.ललिता यांनी जगाचा निरोप घेतला इतर मुलींसाठी शिक्षणाची प्रेरणा त्या सोडून गेल्या ज्या नेहमीच पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER