भारतात विकासाची प्रक्रिया पुन्हा गतिमान होईल – मोदी

Narendra Modi

दिल्ली : भारताची क्षमता, प्रतिभा, टेक्नोलॉजी, आपत्ती व्यवस्थापन, कल्पकता, शेतकरी आणि इंडस्ट्रीचे नेतृत्व करणाऱ्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. भारतात विकासाची प्रक्रिया पुन्हा गतिमान होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीआयआयच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.

सीआयआयला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.

मोदी म्हणाले की, करोनामुळे आपला विकासाचा वेग कितीही मंद झाला असला तरी, भारताने ‘लॉकडाउन’ मागे सोडून ‘अनलॉक फेज १’ मध्ये प्रवेश केला आहे. अर्थव्यवस्थेला गती देणारे अनेक क्षेत्र सुरू झाले आहेत. आठ जूननंतर त्यामध्ये अधिक गती येईल.

जगात करोना व्हायरस पसरत असताना भारताने योग्य पावले उचलली असे मोदी म्हणालेत. लॉकडाउनच्या काळात घेतलेले निर्णय दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील. करोना व्हायरस विरुद्ध लढताना अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्यासाठी सरकारने तात्काळ आवश्यक पावले उचलली. दीर्घकाळाच्या दृष्टीने देशाच्या हिताचे ठरतील असे अनेक निर्णय घेतले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतंर्गत ५३ हजार कोटींची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सुधारणांसंबंधींचे निर्णय असेच घेतलेले नाहीत. एक निश्चित विचार करुन भविष्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत असे मोदी म्हणालेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER