पूर्वोत्तरशिवाय भारताची संस्कृती अपूर्ण – अमित शहा

Amit Shah

नवी दिल्ली : पूर्वोत्तरशिवाय भारताची संस्कृती (Indian Culture) अपूर्ण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले. रविवारी ‘डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट-२०२० फेस्ट’चे ऑनलाईन उद्घाटन करताना ते म्हणाले की, पूर्वोत्तरच्या संस्कृतीशिवाय भारताच्या संस्कृतीची कल्पनाही करता येत नाही.

या भागातील अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी पर्यटन आणि रोजगारावर लक्ष देणे आवश्यक होते. यासाठी या भागात शांतता पाहिजे. गेल्या ६५ वर्षांत या भागातून उग्रवाद, हिंसा, भारत बंद याबाबतच्याच बातम्या येत होत्या. मोदी सरकारच्या काळात आठ उग्रवादी संघटनांच्या ६०० पेक्षा जास्त लोकांनी आत्मसमर्पण केले आहे. आता या भागाबाबत विकास, उद्योग, जैविक शेती, स्टार्टअप याची चर्चा होते, असे ते म्हणाले.

या भागात भारत – बांगलादेश जमिनीचा वाद, मणिपूरची नाकेबंदी, ब्रू-रिंग समझौता, बोडो समझौता असे अनेक प्रश्न होते. यावर तोडगा काढण्यात आला. शहा म्हणाले की, गृहमंत्री म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की, २०२४ पूर्वी या भागातील प्रश्न सुटलेले असतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER