देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५००० पार; १६६ लोकांचा मृत्यू

 राज्यातही परिस्थिती गंभीर

Corona Virus

मुंबई :- कोरोना व्हायरस भारतात वेगाने फोफावताना दिसत असून देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांचा देशातील आकडा ५००० पार गेला असून आतापर्यंत १६६ लोकांनी जीव गमावला आहे. त्याचबरोबर एकूण ४१० लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या ५७३४ वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार, आंध्रप्रदेशमध्ये ३०५ लोक या महामारीचे शिकार झाले आहेत. तर आतापर्यंत चार  लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ६४ वर पोहचला आहे. महाराष्ट्रामध्ये १०१८ लोक या आजाराने पीडित आहेत. आतापर्यंत ७९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मणिपूरमध्ये दोन, मिझोराममध्ये एक, ओडिशामध्ये ४२ या आजारामुळे पीडित असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पद्दुचेरीमध्ये पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

रत्नागिरी: राजीवडा, साखरतर परिसरातील २ डॉक्टरांसह तब्बल ५२ जण क्वॉरंटाईन

इतर राज्यांबाबत बोलायचे झाले तर, दिल्लीमध्ये कोरोनापीडित लोकांची संख्या ५७६ वर पोहचली आहे. २१ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर नऊ  जणांचा मृत्यू झाला आहे. गोव्यामध्ये फक्त सात लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातमध्ये १६५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून २५ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

अंदमान निकोबारमध्ये १० कोरोनाग्रस्त आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये एक, आसाममध्ये २७ आणि बिहारमध्ये ३८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. बिहारमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर चंदीगडमध्ये १८ आणि छत्तीसगडमध्ये १० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हरियाणामध्ये १४७ लोकांना कोरोना झाला आहे. तर २८ जणांना डिस्चार्ज दिला आहे. या राज्यामध्ये कोरोनामुळे तीन  जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलप्रदेशमध्ये १८ लोक कोरोनाग्रस्त असून दोघांना घरी सोडण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग झालेल्यांचा आकडा जम्मू-काश्मीरमध्ये वाढताना दिसत आहे. येथे ११६ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे, तर दोन  जणांचा मृत्यू झाला आहे. झारखंडमध्ये आतापर्यंत फक्त चार  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कर्नाटकात १७५ लोक कोरोना पॉझिटिव्ह असून २५ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. तर चार  जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये ३३६ कोरोनाग्रस्त आहेत, तर ७० लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. लदाखमध्ये १४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १० जण बरे झाले आहेत. मध्यप्रदेशमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २२९ वर पोहचला असून आतापर्यंत १३ लोकांचा मृत्यू झाला आहे.

पंजाबमधील ९१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून सात  जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार  जण कोरोनामुक्त झाले आहेत. राजस्थानमध्ये हा आकडा वाढून ३२८ पर्यंत पोहचला असून तीन  लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये हा आकडा वेगाने वाढत आहे. राज्यामध्ये ६९० लोकांना या आजाराने ग्रासले आहे. आतापर्यंत सात  लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तेलंगणामध्ये ४२७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर ३५ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून सात  लोकांचा मृत्यू झाला आहे.


Web Title : India’s covid 19 tally rises to 5734 cases, death toll touches 166

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)