फ्रेंच ओपनमध्ये भारताचे आव्हान संपले

Rohan Bopanna - Divij Sharan

फ्रेंच ओपन टेनिस (French open Tennis) स्पर्धेत भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपले आहे. रोहन बोपन्ना (Rohan Bopanna) व दिवीज शरण (Divij Sharan) हे पहिल्याच टप्प्यावर बाद झाले आहेत. रोहन बोपन्ना व कॕनडाचा डेनिस शापोव्हालोव्ह (Dennis Shapovalov) ही जोडी होती. त्यांना जॕक साॕक व व्हासेक पाॕस्पीसील या जोडीने 6-2, 6-2 अशी मात दिली.

शापोव्हालोव्हचा एकाच दिवसातील हा दुसरा सामना होता. त्याआधी पुरुष एकेरीत पाच सेटच्या दीर्घकाळ चाललेल्या लढतीत तो रॉबेर्तो कार्बालेस बेना ह्याच्याकडून पराभूत झाला होता. त्यानंतर लगेचच त्याला हा सामना खेळावा लागला होता. लागोपाठ हे सामने आल्यामुळे शापोव्हालोव्हने फ्रेंच ओपनच्या सामन्यांच्या कार्यक्रमावरही टीका केली आहे.

त्याआधी दिविज शरण हासुध्दा पहिल्याच फेरीत बाद झाला. युएस ओपनमध्येही तो पहिली फेरी पार करू शकला नव्हता. यावेळी तो दक्षिण कोरियाच्या क्वोन सून वूच्या जोडीने खेळत होता. युएस ओपनमध्ये निकोला कासिक हा त्याचा साथीदार होता.

शरण व सुन वू जोडीला फ्रँकौ स्कुगोर व अॕस्टीन क्रायसेक ह्या जोडीने 6-2, 4-6, 6-4 असे पराभूत केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER