भारताचे लष्कर जगात चौथ्या क्रमांकाचे

Indian Army - Maharastra Today

नवी दिल्ली : जगात चीनचे लष्कर सर्वांत सामर्थ्यवान आहे. भारताच्या लष्कराचा क्रमांक चौथा आहे. दुसरा क्रमांक अमेरिकेचा आणि तिसरा रशियाचा आहे.

डिफेन्स वेबसाइट असलेल्या मिलिटरी डायरेक्टच्या नव्या अहवालात हे सांगितले आहे. चीनने या मूल्यांकनात १०० पैकी ८२ गुण मिळवत पहिला क्रमांक पटकावला आहे. अमेरिका आपल्या लष्करावर जगात सर्वाधिक खर्च करते. मात्र, अमेरिका या यादीत ७४ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशियाला ६९ गुण मिळाले असून त्याचा क्रमांक तिसरा आहे. भारताला ६१ गुण मिळाले असून तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारताला राफेल लढाऊ विमाने पुरवणारा फ्रान्स पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला ५८ गुण मिळाले आहे. ब्रिटन या यादीत नवव्या क्रमांकावर आहे; त्याला ४३ गुण मिळाले आहे.

हा अहवाल तयार करण्यासाठी लष्करावर करण्यात येणारा खर्च, लष्करी सैन्याची संख्या, लष्कर, वायुदल आणि नेव्हीमध्ये असणारी एकूण क्षेपणास्त्रे, सरासरी पगार, लष्करी वेपन्स आणि त्याचे वजन अशा अनेक कसोट्या होत्या.

लष्करावर अमेरिका सर्वांत जास्त ७३२ अब्ज डॉलर, चीन २६१ अब्ज डॉलर तर भारत ७१ अब्ज डॉलर खर्च करतो. चीनचे नौदल सर्वांत सामर्थ्यवान आहे तर अमेरिकेचे वायुदल. रशियाच्या लष्कराचे सामर्थ्यही जागतिक पातळीचे गणले जाते.

गेल्या काही वर्षांत भारताचा लष्करावरील खर्च वाढतो आहे. एकीकडे पाकिस्तानचा धोका तर दुसरीकडे चीनच्या कुरापती यामुळे भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणाचा खर्च वाढणे आवश्यक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER