भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट बघा! तृणमूलच्या खासदाराचे भाजपाच्या टीकेला उत्तर

Maharashtra Today

कोलकाता : ‘यास’ चक्रीवाळच्या (Yaas Cyclone)नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी घेतलेल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) अर्धा तास उशिरा पोहचल्या आणि पंतप्रधानांना लिखित अहवाल देऊन लगेच निघून गेल्या. यावरून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra)म्हणाल्या – भारतीय १५ लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट बघा!

‘’चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक शिष्टाचार आणि संघराज्यवादावर आघात आहे,” असे केंद्र सरकारने ममतांनी केलेल्या विलंबावरून म्हटले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही यासाठी ममतांवर टीका केली होती.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणूक प्रचारात मोदी म्हणाले होते की, परदेशात असलेला काळा पैसे परत आणला तर देशातल्या प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपये मिळू शकतील. याचा शब्दशः अर्थ घेऊन महुआ मोईत्रा यांनी ट्विट केले – “३० उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा!”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button