
भारत आणि चिन सैनिक एकमेकांशी भिडले आहेत. यात २० जवान जखमी झालेत. बातमीनूसार या हिंसक संघर्षादरम्यान भारतीय हद्दीत घुसु पाहणाऱ्या चिनी सैन्याचे प्रयत्न उधळून लावलेत. ही झडप तीन दिवस आधी सिक्कीमच्या नाकु ला बॉर्डवर झालीये. मागच्या आठवड्यात चीनी सैन्यानं भारतीय सीमा ओलांण्याचा प्रयत्न केला होता. यामुळं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन्ही देशांच्या सैन्यात झालेला हा संघर्ष किरकोळ असला तरी याचे नंतरच्या काळात गंभीर स्वरुपाचे परिणाम होवू शकतात.
“सिक्कीम सेक्टरमध्ये भारतीय सैन्य (Indian Army) आणि चीनचं पीपल्स लिबरेशन आर्मी पीपीएलमध्ये झालेल्या संघर्षावरुन अनेक प्रश्न उठत आहेत. मागच्या २० जानेवारीला सिक्कीमच्या उत्तर भागात नाकुला एरियात भारत आणि चीन सैन्यात किरकोळ संघर्ष झाला. वादाची स्थिती सैन्य अधिकाऱ्यांद्वारे आपपासात चर्चा करुन सोडवण्यात आली.” अशी माहिती सैन्यदलाकडून देण्यात आलीये. तसेच “माध्यमांनी वाढवून चढवून रिपोर्टींग टाळावं. तणाव निर्माण होईल अशी परिस्थीती निर्माण करु नये” असं आवाहन सैन्य दलाकडून माध्यमांना करण्यात आलंय.
गलवान घटनेनंतर दुसऱ्यांदा तणावाची स्थिती
मागच्या वर्षी १५ जून २०२०ला भारतीय सैन्य आणि चीनी सैन्याची गलवान घाटीत झडप झाली होती. तेव्हा भारतीय सैन्यात पुर्व लदाखच्या गलवान घाटीत पॉइंट १३वर गस्त घालण्यासाठी गेलं होतं. तेव्हा दोन्ही सैन्यात झालेल्या झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक मरण पावले होते. या घटनेनंतर परिस्थीती गंभीर झाली होती. तेव्हा पासून गलवानला लागून असलेल्या भारत चीन सीमेवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलंय. गेल्या सहा महिन्यांपासून तिथं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी वारंवार चर्चा झाल्यात. यातच रविवारी पुन्हा दोन्ही देशात चर्चा झाली. पूर्व लदाखच्या चुशूल भागात ही चर्चा जवळपास १५ तास चालली.
नाकु लामध्ये याआधीही झाली होती घुसखोरी
चीनी सैन्यानं याआधी नाकुला सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या वर्षीच्या९ मेला चीनी सैनिकानं सिक्कीमच्या नाकुला सेक्टमधल्या भारतीय हद्दित घुसखोरी केली होती. त्यावेळी देखील दोन्ही देशाच्या सैन्यात वाद झाल्याचं पहायला मिळालं होतं. तेव्हा भारताचे चार आणि चीनचे सात जवान जखमी झाले होते. तेव्हा दोन्ही सैन्यातील १५०हून अधिक सैनिकांची झटापट झाली होती. नंतर सैन्याधिकाऱ्यांनी आपापसात चर्चा करुन मधला मार्ग काढला होता.
नंतर या हिंसेचा व्हिडीओ व्हायरल झाला. भारत आणि चीनचे सैनिक एकमेकाला खेटताना या व्हिडीयोत दिसले होते.
‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला