क्रिकेटपटूंनी नियमांचे पालन केले, भारतीय संघ व्यवस्थापनाचा दावा

Indian team management refutes allegations sport news in marathi

मेलबोर्नमध्ये (Melbourne) रोहित शर्मा (Rohit Sharma) , ऋषभ पंत, शुभमान गील, पृथ्वी शाॕ व नवदीप सैनी यांच्या रेस्टारंटमधील पार्टी (Restaurant Party) प्रकरणाने वादळ उठले असले तरी भारातीय संघाने मात्र या खेळाडूंनी बायो बबल नियम मोडल्याचा इन्कार केला आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने दावा केलाय की हे खेळाडू नियमाचे पालन करत बाहेर मोकळ्या जागेतच बसले होते. रिमझीम पाऊस सुरु झाल्यानंतरच ते रेस्टाॕरेंटच्या आत गेले होते. त्यामुळे नियमभंग झाला असे म्हणता येणार नाही असा भारतीय संघ व्यवस्थापनाचा दावा आहे.

क्रिकेट आॕस्ट्रेलियाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलेय की, या पाचही खेळाडूंचे दोन्ही संघांपासून विलगीकरण करण्यात आले आहे. पण दोन्ही संघातील खेळाडूंच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या नियमांचे पालन करत ते सराव करतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व क्रिकेट आॕस्ट्रेलिया या प्रकरणात खरोखरच नियमांचा भंग झाला आहे काय, याची चौकशी करत आहे. दरम्यानच्या काळात दोन्ही संघांच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार या खेळाडूंना खबरदारी म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघाचा प्रशंसक नवलदीप सिंह याने सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटपटूंच्या रेस्टाॕरेंट भेटीची माहीती व्हायरल केल्याने हे प्रकरण समोर आले. सिंग याने याबाबतचा एक व्हिडिओसुध्दा पोस्ट केला असून या खेळाडूंचे खानपानाचे 118.69 आॕस्ट्रेलियन डाॕलरचे बील आपण अदा केल्याचा दावासुध्दा त्याने केला आहे. ऋषभ पंतला अलिंगन दिल्याचेही त्याने म्हटले होते पण नंतर याचा इन्कार केला आहे. आम्ही सोशल डिस्टन्सिंगचे पूर्ण पालन केले असे त्याने आपल्या खुलाशात म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळातील ताणाताणीने ब्रिस्बेन कसोटी धोक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER