भारतीय संघात कोण आत? कोण बाहेर?

India's Tour Of Australia 2020-21

ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यात रोहित शर्मा (Rohit Sharma), इशांत शर्मा (Ishant Sharma) व रिषभ पंतला (Rishabh Pant). स्थान मिळालेले नाही. 26 आॕक्टोबरपासून भारतीय संघ (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, वन डे आणि टी-20 सामने खेळणार आहे.

रोहित व इशांत हे दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत पण रोहितची दुखापत खरोखरच संघाबाहेर ठेवण्याइतपत गंभीर आहे का, याची चर्चा सुरु झाली आहे. संघात वरुण चक्रवर्ती हा एकच नवा चेहरा आहे. रिषभ पंतने कसोटी संघातील स्थान गमावले आहे.

कसोटी संघाबद्दल बोलायचे झाले तर के.एल. राहुल (K.L. Rahul) वर्षभरानंतर संघात परतलाय. याच्यापूर्वी राहुलची जागा शुभमान गिलने घेतली होती. शुभमान गिलने संघातील स्थान कायम राखले आहे. इशांत शर्माच्या जागी आयपीएलमध्ये चमकलेला मोहम्मद सिराज याला संघात स्थान देण्यात आले आहे. सिराज यापूर्वी 2018 मध्ये मायदेशातील विंडीजविरुध्दच्या मालिकेसाठी भारतीय संघात होता.

याप्रकारे कसोटी संघात के.एल. राहुल, कुलदीप यादव व मोहम्मद सिराज आले आहेत तर इशांत शर्मा बाहेर झाला आहे.

वन डे संघात शिखर धवन परतला आहे. त्याने पृथ्वी शाॕची जागा घेतली आहे. न्यूझीलंड दौऱ्यानंतर संघातील स्थान गमावलेला मयांक अगरवाल परतला आहे. शार्दुल ठाकुरही संघात परतला आहे. राहुलला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.

वन डे संघातून पृथ्वी शाॕ, रिषभ पंत बाहेर झाले आहेत. भुवनेश्वर कुमार व रोहित शर्मा हे दुखापतीमुळे संघात स्थान मिळवू शकलेले नाहीत.

टी- 20 संघामार्फत वरुण चक्रवर्ती हा एकमेव नवा चेहरा संघात आला आहे. रिषभ पंत व कुलदीप यादवने स्थान गमावले आहे मात्र आयपीएलमध्ये नंतरच्या सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी करु न शकलेला संजु सॕमसन मात्र संघात कायम आहे.

याप्रकारे टी-20 संघात शिखर धवन, मयंक अगरवाल, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, वरुण चक्रवर्ती हे आलेले आहेत तर रिषभ पंत, शिवम दुबे, कुलदीप यादव, रोहित शर्मा व शार्दुल ठाकूर बाहेर झालेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER