भारतीय वंशाचे श्रीनिवासन अमेरिकेत मुख्य न्यायाधीश नियुक्त

Srinivasan

वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे कायदातज्ज्ञ पद्मनाभन श्रीकांत ऊर्फ श्रीनिवासन (५२) यांची अमेरिकेतील फेडरल सर्किट न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे. श्रीनिवासन यांचा जन्म चंदीगड येथे झाला. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानंतर फेडरल सर्किट न्यायालय हे द्वितीय क्रमांकाचे न्यायालय आहे.

अमेरिकेतील द्वितीय उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणून श्रीनिवासन यांनी काम पाहिले आहे. या पदावर काम करणारे श्रीनिवासन हे दक्षिण आशियाई वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. श्रीनिवासन बी. ए. उत्तीर्ण असून, स्टॅनफोर्ड विधी विद्यालयातून उच्च श्रेणीत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. न्यायाधीश जे. हारवी विल्कीन्सन यांचे सहायक म्हणून व्यावसायिक जीवनाला सुरुवात करणारे श्रीनिवासन आता अमेरिकेत मुख्य न्यायाधीश बनले आहेत. श्रीनिवासन यांचे मूळ गाव तमिळनाडूत आहे. १९७० मध्ये श्रीनिवासन यांचे वडील अमेरिकेच्या कन्सास शहरातील लॉरेन्स येथे स्थायिक झाले.

अमेरिकेतच श्रीनिवासन लहानाचे मोठे झाले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून श्रीनिवासन यांनी बी. ए. ची पदवी घेतली. त्यानंतर स्टॅनफोर्ड लॉ स्कूलमधून जे. डी. पदवी मिळवली व स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये श्रीनिवासन यांनी २५ खटले लढवले आहेत.

बराक ओबामा यांचे आवडते
२०१३ मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया जिल्ह्याच्या फेडरल कोर्ट ऑफ अपील्सच्या न्यायाधीश या उच्चपदी नेमणूक झाल्यानंतर श्रीनिवासन हे आवडते न्यायाधीश असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले होते. “माझ्या आवडत्या व्यक्तींपैकी श्रीनिवासन हे आहेत. तसेच अमेरिकन फेडरल कोर्ट ऑफ अपील्सवर पहिल्या दक्षिण आशियाई वंशाच्या न्यायाधीशाची नियुक्ती झाली ही माझ्यासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.” असं ओबामा म्हणाले होते.

पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवणे; चीन देणार भारताला साथ