सिक्कीममध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट, 20 चिनी सैनिक जखमी

नवी दिल्ली : लडाखच्या सीमेवर भारत-चीन (India-China)दरम्यान तणाव असताना पुन्हा एकदा भारत चीन सैनिकांमध्ये (Chinese soldiers) झटापट झाल्याची माहिती मिळत आहे. सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चीनचा अतिक्रमणाचा हा डाव उधळून लावला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार मागच्या आठवडयात चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना आव्हान दिले. उत्तर सिक्कीमच्या नाकु ला येथे ही घटना घडली. भारताच्या जवानांनी पीएलएच्या सैनिकांना रोखल्यानंतर जोरदार हाणामारी झाली. सिक्कीमच्या नाकु ला येथे झालेल्या या घटनेमध्ये 20 चिनी सैनिक जखमी (20 PLA soldiers injured) झाले आहेत. तर भारताचेही चार जवान जखमी झाले आहेत.

उत्तर सिक्कीमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असतानाही, भारतीय जवानांनी चीनचा घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. पीएलएच्या सैनिकांना मागे ढकलले. चकमक झालेल्या ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती आहे. सिक्कीकमध्ये अत्यंत प्रतिकुल वातावरण असले, तरी भारतीय सैन्याचे चीनच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER