भारतीयांच्या वाट्याची लस निर्यात केली नाही – अदर पूनावाला

Adar Poonawalla - Corona Vaccine

देशात कोरोनाच्या लसींचा तुटवडा जाणवतो आहे. देशातील लसी इतर देशांना का दिल्या? अशी ओरड सोशल मीडियावर सुरू आहे. याला सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute) कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी सोशल मीडियावर पत्रक पोस्ट करून उत्तर दिले – भारतीयांच्या वाट्याची लस निर्यात केली नाही, असे सांगितले.

जगातील कोरोनाचे संकट खूप मोठे आहे. हे रोखण्यासाठी लस खूप मोठं हत्यार आहे. मात्र लसनिर्मिती करताना अनेक अडचणींचाही सामना करावा लागतो आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचं लसीकरण होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागतील. आपल्या देशात जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले आहे. त्यात ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चे लसीकरण सर्वांत प्रथम करण्यात आले. इतर देशातील कोरोना संकट पाहता आपण त्यांना मदतीचा हात दिला आणि लस निर्यात केली. त्याचीच फेड म्हणून आज इतर देश भारताला मदत करत आहेत. हा कोरोना व्हायरस देशांच्या सीमेपर्यंत मर्यादित नाही. संपूर्ण जगाचे लसीकरण झाले पाहिजे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहता दोन ते तीन महिन्यांत लसीकरण करणे अशक्य आहे. देशातील लसींची मागणी लक्षात घेऊन आम्ही दिवस-रात्र त्यावर मेहनत घेत आहोत.’ असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button