
नागपूर : भारतीय रेल्वेने २.८ किलोमीटर लांबीची मालगाडी चालवून इतिहास निर्माण केला आहे. या मालगाडीला रेल्वेने ‘शेषनाग’ असं नाव दिले आहे. ही भारतातील आतापर्यंतची ही सर्वात लांब रेल्वेगाडी आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने चार मालगाड्यांचे डबे जोडून शेषनाग तयार केली. या मालगाडीत एकूण २५१ डबे जोडले होते. ही मालगाडी ओढण्यासाठी सात इलेक्ट्रिक इंजिनही लावले होते. सुरूवातीला तीन आणि मध्यभागी चार.
रेलवे द्वारा देश में रेकार्ड 2.8 किमी लंबी मालगाड़ी का सफलतापूर्वक परिचालन किया गया। 4 ट्रेनों को जोड़कर शेषनाग नाम से मालगाड़ी चलाने का यह प्रयोग सफल रहा।
इससे एक बार में अधिक सामान को एक स्थान से दूसरे स्थान पर भेजा जा सकता है। pic.twitter.com/FgQocG00La
— Piyush Goyal (@PiyushGoyal) July 2, 2020
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हीजनने गुरुवारी नागपूर विभाग ते कोरबा दरम्यान शेषनाग २५१ रिकाम्या डब्यांसह चालवली. शेषनागने ६ तासात २६० किमी प्रवास केला. हा प्रयोग माल वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचवण्यासाठी करण्यात आला. शेषनागला ६ हजार हॉर्स पॉवरचे ४ इलेक्ट्रिक इंजिन लावले होते.
याआधी भारतीय रेल्वेने ‘सुपर अॅनाकोंडा’ ही २ कि. मी. लांब गाडी चालवली होती. तिला ६ हजार हॉर्स पॉवरचे तीन इलेक्ट्रिक इंजिन लावले होते. हीची चाचणी ओडिशातील लाजकुरा ते राउरकेला दरम्यान करण्यात आली होती.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले – रेल्वेने देशात विक्रमी २. ८ किलोमीटर लांबीच्या मालगाडीची यशस्वी चाचणी केली आहे. ४ गाड्या जोडून शेषनाग नावाने मालगाडी चालवण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
यामुळे एकावेळी जास्त सामान एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येईल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला