नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनलवर बंदी!

Yuba Raj Khativada

काठमांडू : नेपाळ आणि भारतातील तणावपूर्ण संबंधांनंतर नेपाळच्या सरकारने भारतीय न्यूज चॅनलवर बंदी घातली आहे. दूरदर्शन वगळता अन्य सर्व वाहीन्या पाहण्यासाठी नेपाळने बंदी घातली आहे. भारतीय न्यूज चॅनलवरून नेपाळ सरकार आणि पंतप्रधानांची बदनामी व गैरप्रचार करत असल्याचा नेपाळ सरकारने आरोप केला आहे. अशी माहिती नेपाळमधील केबल प्रोव्हायडर्सने एएनआयला दिली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “नेपाळमध्ये भारतीय न्यूज चॅनलचे सिग्नल बंद करण्यात आले असल्याची माहिती नेपाळी केबल प्रोव्हायडर्सने दिली. मात्र, असे असले तरी आतापर्यंत नेपाळ सरकारकडून अधिकृत आदेश काढण्यात आलेला नाही.” असेही एएनआयने म्हटले आहे.

नेपाळमधील माध्यमांनुसार “नेपाळ सरकार आणि आमचे पंतप्रधान यांच्याविरोधात भारतीय माध्यमं विनाआधार प्रचार करत आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलंडल्या आहेत. आता हे अती झालं आहे. भारतीय माध्यमांनी आपली बडबड बंद करावी.” असे सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ म्हणाले.