चीनची कोंडी फोडण्यासाठी भारतीय नौसेनेचा जपान- अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासोबत सुरू आहे युद्ध अभ्यास!

Maharashtra Today

गेल्या काही दिवसांपासून भारत विरुद्ध चीन अशी परिस्थीती निर्माण झालीये. मागची वर्षी युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली होती. दिवसेंदिवस ही परिस्थीती चिघळत आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन हिंदी महासागरात प्रभवा वाढवू पाहतंय. याला रोखथांब करण्यासाठी भारतीय नौसेनं कंबर कसलीये. मित्र देशांच्या सोबतीनं भारतीय नौसेनं (Indian Navy)अनेकदा हिंदी महासागरात युद्ध अभ्यास केलाय.

ताज्या उदाहरणाकडं पहायचं झालं तर दोन दिवसांपूर्वी भारतीय नौसेनेनं ‘पॅसेक्स’ नावानं युद्ध अभ्यास केला. हिंद महासागराकडील पुर्व दिशेला त्यांनी हा अभ्यास केला. भारतीय नौसेनेच्या क्षमतेच दर्शन यावेळी चीनसह देशभराला झालं. या युद्ध अभ्यासात भारतीय नौसेनेची युद्धनौका ‘शिवालिक’सह हेलिकॉप्टर आणि दुरवर मारा करण्यास सक्षम असणाऱ्या पी८आय यांनी अमेरिकेचे जहाज युएसएस थियोडोर रुजवेल्ट कॅरिअर स्ट्राइक सहित ग्रुपमध्ये हिस्सा घेतला.

गेल्या मंगळवारी हिंद महासागरात फ्रेंच नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. दोन्ही राष्ट्रांमध्ये समुद्रावरील सुरक्षिततेसंबंधी नियमांची चौकशी झाली. दोन्ही देशांमध्ये ‘वरुण’ या नावानं युद्ध अभ्यासाला सुरुवात होणारंय. एप्रिल महिन्यात सुरु होणाऱ्या युद्ध अभ्यासासाठी ही बैठक महत्त्वाची होती असं बोललं जातंय.

फ्रान्सच्या नौसेनेच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच भारतीय नौसेना बंगालच्या घाडीत युद्ध अभ्यास करणार आहे. या युद्ध अभ्यासाला ‘ला पेरोसा’ असं नाव देण्यात आलंय. यात ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेची नौसेना सहभाग घेणार आहे. जहाजं, पानबुड्या सोबत विमानं आणि भारतीय सेना, वायुसेना सह तटरक्षक दलाच्या सोबतीनं भारतीय नौसेनं ‘ट्रोपेक्स’ (Tropex) नावच्या युद्ध अभ्यासाच आयोजन केलं होतं.

हिंद महासागरात चीनचा वाढतोय प्रभाव

गेल्या दशकापासून चीननं हिंदी महासागरात प्रभाव वाढवण्यास सुरुवात केलीये. चीनच्या हलचाली आगामी काळात भारतासाठी धोकादायक ठरु शकतात असं मत सुरक्षा तज्ञ व्यक्त करतायेत. चीनपासून ते आफ्रिकेपर्यंत चीननं प्रभाव वाढवलाय. तसेच इराण आणि इराक सोबत त्यांनी मोठे करार केलेत. इराणमध्ये चीनची उपस्थीती भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. भारताला तेलाचा पुरवठा करणाऱ्या इराणवर भारत अवलंबून आहे. त्यामुळं भौगोलिक परिस्थीतीचा फायदा उठवत भारताची कोंडी करण्याच्या दिशेनं चीनी सैन्य हिंद महासागरात हातपाय पसरतं आहे.

चीनच्या आव्हानाला उत्तर कसं द्यायचं?

भारतीय नौसेनेला वाढीव निधी द्यावा. अर्थसंकल्पात मोठी तरतुद करावी. गेल्या वीस ते तीस वर्षांपासून संरक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतुद करावी ही मागणी जोर धरतीये. तो निधी नौसेनेला मिळायला हवा असं निवृत्त नौसेनेतील अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. भारत आता ‘क्वाड सदस्य’ बनलाय. म्हणजे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या राष्ट्रांच्या नौसेनेनं एकत्र येत ही संघटना बनवली आहे.

अमेरिकेकडून अजून जास्तीच्या युद्धनौका हिंदी महासागरात उतरवल्या जाव्यात ही मागणी देखील जोर धरतीये. अमेरिकेला चीनचा धोका आहे. अशा परिस्थीती चीनला घेरण्यासाठी अमेरिकेने मदत करावी असं मत सुरक्षासंबंधी विभागतील तज्ञांनी बोलून दाखवलंय.

युद्ध अभ्यासामुळं काय साध्य होईल?

युद्ध अभ्यासामुळं नौसेनेत व्यापकतेने काम करण्याची कौशल्य निर्माण होतात. युद्ध अभ्यासामुळं शत्रु राष्ट्रवर वचक बसवणं शक्य आहे. निरंतर तैनातीवर राहिलेल्या नौका आणि पाणबुड्यांच्या स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं वारंवार युद्ध अभ्यासांच नियोजन गरजेचं असतं. यामुळं वेग आणि इतर महत्त्वाच्या बाबींवर नजर मारली जाते.

नौसेनेला दिवसातले २४ तास पहारा द्यावा लागतो. यातच युद्ध लढण्यासाठीची कौशल्य आणि रणनितींना बढावा मिळण्यासाठी युद्ध अभ्यास गरजेचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button