भारतीय इंजिनीअरने तयार केले ‘पॉकेट व्हेंटिलेटर’

Pocket Ventilator - Dr. Ramendra Lal Mukherjee

कोलकाता : येथील इंजिनीअर डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी (Dr. Ramendra Lal Mukherjee) यांनी बॅटरीवर चालणारे पॉकेट व्हेंटिलेटर (Pocket Ventilator) तयार केले आहे. डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांना काही काळापूर्वी कोरोना (Corona) झाला होता. काही दिवसांत ते कोरोनातून बरे झाले. आजारी असताना रुग्णांचे हाल पाहून सर्वांना परवडेल असे व्हेंटिलेटर तयार करण्याचे त्यांनी ठरवले. बरे झाल्यानंतर २० दिवसांतच त्यांनी खिशात मावेल एवढे व्हेंटिलेटर तयार केले.

डॉ. रामेंद्र लाल मुखर्जी यांनी तयार केलेल्या व्हेंटिलेटरचे वजन फक्त २५० ग्रॅम आहे. ते बॅटरीवर चालते. त्यात दोन युनिट्स आहेत, पाॅवर आणि व्हेंटिलेटर, हे दोन्ही मास्कला जोडलेले आहेत. बटण दाबताच व्हेंटिलेटर सुरू होते आणि रुग्णाला ऑक्सिजन मिळतो. एका बटणाने हवेचा प्रवाह नियंत्रित करता येतो. या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाचा प्रसार कमी होईल. रुग्ण आणि डॉक्टरांना दिलासा मिळेल, असा दावा मुखर्जी यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button