भारतीय बॉक्सर दीपक भोरियाची विश्वविजेत्यावर मात

Deepak Bhoria

भारताचा फ्लायवेट बॉक्सर दीपक भोरिया याने मोठा विजय नोंदवताना विश्व आणि आॕलिम्पिक विजेत्या शाखोबोदीन झोयरोव्ह याला मात दिली.या मोठ्या विजयासह त्याने स्ट्रान्जा स्मृती स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. बल्गेरीयातील सोफिया येथे ही स्पर्धा खेळली जात आहे. त्यात भोरिया याने 4-1 असा विजय मिळवला.

23 वर्षीय दीपक हा 2019 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या 49 किलोगटाचा रौप्यपदक विजेता आहे मात्र आता तो 52 किलोगटात खेळतो आणि त्याने उझबेकिस्तानच्या झोयरोव्हविरुध्दच्या लढतीत आपल्या जोरदार ठोशांनी वर्चस्व गाजवले. 2019 मध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत अमीत पंघाल हा झोयरोव्हकडून पराभूत झाला होता पण त्यावेळी भोरियाने झैयरोव्हच्या खेळाचा अभ्यास करुन ठेवला होता. त्याचा त्याला फायदा झाला. अमीत भाईच्या त्या लढतीचा मला प्रत्येक क्षण आठवतो आणि ते बघून आपण या विश्वविजेत्याविरुध्द सराव करायची कल्पना करत सराव करत गेलो असे दीपकने म्हटले आहे. विश्व आणि आॕलिम्पिक विजेत्याला मात देणे ही मोठीच विश्वासवर्धक गोष्ट आहे, या अशा विजयांचा मानसिक व तांत्रिकदृष्ट्या मोठा फायदा होत असतो असे त्याने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER