
ऑस्ट्रेलियन (Australia) फलंदाजांनी शुक्रवारी भारतीय (India) गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ३७४ धावांचा डोंगर रचला आणि यात पाचपैकी चार गोलंदाजांच्या वाट्याच्या १० षटकांत प्रत्येकी ६० वर धावा वसूल केल्या.
मोहम्मद शामी (Mohammed Shami) एकटा बचावला; पण त्यानेसुद्धा १० षटकांत ५९ धावा मोजल्या. जसप्रीत बुमरासारख्या (Jasprit Bumrah) गोलंदाजाने ७३ धावा दिल्या. नवदीप सैनीने ८३, युझवेंद्र चहलने ८९ आणि रवींद्र जडेजाने ६३ धावा मोजल्या. भारतीय क्रिकेट संघाबाबत केवळ दुसऱ्यांदा सर्वच गोलंदाज असे महागडे ठरले आहेत.
यापूर्वी २०१८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध गुवाहाटी येथील सामन्यात असे घडले होते. त्यावेळी विंडीजने ३२२ धावा करताना प्रत्येकी १० षटकांत शामीच्या गोलंदाजीवर ८१, उमेश यादवने ६४, खालिद अहमदच्या ६४ व रवींद्र जडेजाच्या १० षटकांत ६६ धावा वसूल केल्या होत्या. युझवेंद्र चहल मात्र प्रभावी ठरला होता. त्याने ४१ धावांत तीन गडी बाद केले होते. भारताने तो सामना ८ गडी राखून जिंकला होता; पण आता सिडनीत भारतीय संघ पराभूत झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला