भारतीय लष्कर म्हणजे जनरल डायर!’; मार्कंडेय काटजूचे वादग्रस्त वक्तव्य

Justice Katju

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी भारतीय लष्करप्रमुखांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे . तसेच ‘देशातील राजकारण्यांनी लष्कराला कायम बळीचा बकरा केलेले आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे. काटजू यांच्या वादग्रस्त विधानावर सर्व स्तरावरून टीका होत आहे.

काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या चकमकीदरम्यान सात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, ‘भारतीय लष्कर जालियनवाला बागेत बेछूट गोळीबाराचे आदेश देणारा ब्रिटिश जनरल डायर याच्याप्रमाणे वागत आहे’, असे काटजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. त्यानंतर पुन्हा फेसबुकवर त्यांनी एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. ‘भारतीय लष्कराला शाबासकी..ज्याप्रकारे जनरल डायरने जालियनवाला बागेत आणि लेफ्टनंट कैलीने व्हीएतनाममधील माई लाई येथे केलं अगदी तसंच काश्मीरमध्ये भारतीय सेनेने लोकांना मारण्यास सुरुवात केली आहे. सर्व भारतीय लष्कर अधिकारी आणि जवानांना भारतरत्न दिला पाहिजे’. दरम्यान काश्मिरी जनतेला सल्ले देत , ‘काश्मीरमधील दहशतवाद्यांशी भारत कधीही न जिंकणारी लढाई लढत आहे‘, असे विधान काटजू यांनी केले आहे.

काटजू यांनी केलेल्या या मतप्रदर्शनावर देशभरातून टीकेची झोड उठली असून ‘काटजू यांनी नेहमीप्रमाणेच सत्य नेमकेपणाने जाणून न घेताच बेताल वक्तव्ये केली आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी’, अशी मागणी एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने केली आहे .