भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली – मुख्यमंत्री फडणवीस

CM Fadnavis

मुंबई : ज्या वेळी संपूर्ण देश साखर झोपेत होता. जी वेळ अगदी गाढ झोपेची असते हीच संधी हेरून भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त बालाकोट येथे एअर स्ट्राईक मिशन फत्ते केलं आहे. गेल्या ७० वर्षांतली ही मोठी कारवाई मानली जात आहे.

भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी दिली असून त्यांनी भारतीय वायुसेनेचं अभिनंदन केलं आहे. भारतीय वायुसेनेचे अभिनंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस यांनी भारतीय सेनेने एकप्रकारे हुतात्मा जवानांचे बलिदान वाया जाणार नाही हे पाकिस्तानला दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पुलवामा हल्ला झाला त्याच दिवशी मोदींनी स्पष्ट सांगितले होते की, आम्ही याचा बदला घेणारच, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

हि बातमी पण वाचा : भारताला योग्य प्रत्युत्तर देऊ; इम्रान खानची धमकी

माध्यमांमधून येणा-या रिपोर्टमधून जी माहिती समोर आली आहे, त्यावरून ही मोठी कारवाई झाल्याचे स्पष्ट आहे. मला आपल्या वायुसेनेचा अभिमान असल्याचे फडणवीस म्हणाले. या एअर स्ट्राईकने भारतीय सेनेने आपली शक्ती पाकिस्तानला दाखवून दिली असल्याचे फडणवीस म्हणाले.