हॉकीत भारताने उडवला कॅनडाचा धुव्वा

मनदीपचे पुन्हा दोन गोल, वरूणकुमारचेही दोन गोल

India won handsomely in Hockey against

कौलालंपूर : पाच वेळच्या विजेत्या भारतीय हॉकी संघाने आपली विजयी मालिका सुरूच ठेवत अझलान शहा कप हॉकी स्पर्धेत शुक्रवारी पोलंडचा १०-० असा धुव्वा उडवला. यासह भारताचे पाच साखळी सामन्यांअंती १३ गूण झाले असून ते अव्वल स्थानी आहेत. भारताचा विजेतेपदाचा सामना रविवारी कोरियाशी होणार आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत चार सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत सोडवून ते अपराजित आहेत.

याआधीच्या सामन्यात कॅनडाविरुध्द हॅटट्रीक करणाºया मनदीपसिंगने तोच फॉर्म कायम ठेवत या सामन्यातही दोन गोल केले.

भारतासाठी मनदीपने ५० व ५१ व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय वरूण कुमारनेही दोन गोल करताना १८ व्या व २५ व्या मिनिटाला भारताची आघाडी वाढवली. सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला विवेक सागर प्रसादने पहिला गोल केला. त्यानंतर सुमीत कुमारने सातव्या, सुरेंदरकुमारने १९व्या, सिमरनजीतसिंगने २९ व्या, नीळकंठ शर्मा याने ३६ व्या आणि अमित रोहिदास याने ५५ व्या मिनिटाला गोल केला.

ही बातमी पण वाचा  : मनू भाकर व सौरभ चौधरीच्या दुसºया सुवर्णपदकाची कमाई

मनदीप सिंगचे आजच्या दोन गोलांसह स्पर्धेत सात गोल झाले असून तो आघाडीवर आहे. वरूण कुमारच्या नावावर पाच गोल आहेत.

पोलंडविरुध्दचा हा सामना एकतर्फीच होणे अपेक्षित होते. त्यात पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने दोन गोल केले तर मध्यंतरालाच भारताकडे ६-० अशी आाघाडी होती.

पोलंडच्या पराभवाचे अंतर आणखीमोठे राहिले असते परंतु त्यांच्या गोलरक्षकाने सुंदर गोलरक्षण केले. चौध्या क्वार्टरमध्ये त्याने भारताच्या गोलाच्या तीन संधी हाणून पाडल्या.