अ‍ॅपबंदीनंतर मोदी सरकारचा चीनला आणखी एक मोठा दणका

Nitin Gadkari

नवी दिल्ली :- चीनसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने चीनवर कडक निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आणखी एक मोठा दणका दिला आहे. चिनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात काम न देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघु  आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ही घोषणा केली. पीटीआयशी बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

नितीन गडकरी यांनी बुधवारी सांगितले की, “जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे महामार्ग प्रकल्प लाटायचा प्रयत्न केल्यास त्यांना देशातील रस्तेनिर्माण क्षेत्राशी संबंधित काम दिले जाणार नाही. ”  तसेच लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये परदेशी गुंतवणूक आणि भागीदारीला महत्त्व देताना यामधून चीनला वगळण्यात येईल, असंही सांगितलं आहे.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, “लवकरच चिनी कंपन्यांवर बंदी आणणारं धोरण आणलं जाईल. तसेच महामार्गाचे काम भारतीय कंपन्यांना मिळावे यासाठी पात्रता निकषमधील नियमांमध्ये शिथिलता आणली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल टाकण्यात आलं.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER