ये नया भारत है…घर में घुसकर मारता है! सेहवागने टीम इंडियाचे केले हटके अभिनंदन

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि मालिका जिंकली. हा सामना अतिशय अटीतटीचा झाला. भारताचा माजी कसोटी खेळाडू वीरेंद्र सेहवाग ने, ये नया भारत है…घर में घुसकर मारता है! म्हणत भारताच्या संघाचे हटके अभिनंदन केले.

सेहवाग ने ट्विट केले – ख़ुशी के मारे पागल. ये नया इंडिया है. घर में घुसकर मारता है. अ‌ॅडलेड कसोटीनंतर ते आज भारताच्या युवा खेळाडूंनी सर्वांना आनंद दिलाय. आपण विश्वचषक याआधी जिंकलाय, पण आजचा विजय खूप महत्वाचा आहे. आणि हो, पंतमुळे हा विजय जास्त महत्वाचा ठरला आहे.


हे ट्विट करताना सेहवागने एका ट्रकचा फोटो ट्विट केला आहे. या ट्रकच्या मागे “ये नया भारत है, घर में घुसकर मारता है”, असे लिहिले आहे. सेहवागचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होते आहे.


प्रत्येक सेशनमध्ये नवा हिरो मिळाला – सचिन

मास्टर ब्लास्टर सचिननेही भारतीय संघांचे तोंड भरुन कौतुक केले. भारताच्या विजयी क्षणाचा फोटो ट्विट करत सचिनने संपूर्ण टीमचे कौतुक केले. “प्रत्येक सेशनमध्ये आपल्याला नवा हिरो पाहायला मिळालाय. जेव्हा आपल्याला दुखापतींना सामोरे जावे लागले तेव्हा आपण आणखी खंबीरपणे उभे राहिलो. स्वत:च्या सीमा ओलांडून निष्काळजीपणे नव्हे, तर निर्भयतेने क्रिकेट खेळलो. दुखापती आणि अनिश्चिततेचा सामना अतिशय संयम व आत्मविश्वासाने केला. आतापर्यंतच्या सर्वात उत्कृष्ट मालिका विजयांपैकी हा एक विजय आहे. भारतीय संघाचे अभिनंदन”, असे ट्विट सचिनने केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER