बीसीसीआयकडून पाच कोटींचा बोनस

कोहली व तेंडुलकरने केले अभिनंदन

ऑस्ट्रेलियात कुणी कसोटी मालिका जिंकणे ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वीही बऱ्याच संघांनी अशी कामगिरी केली आहे; पण ज्या पद्धतीने लढून लढून, वारंवार पडल्यावर उठून आणि अनंत अडथळ्यांवर मात करत भारतीय संघाने ही मालिका जिंकली. त्याने ही मालिका इतरांपेक्षा वेगळी आणि एकमेवाद्वितीय ठरवली आहे, अशा या संस्मरणीय मालिका विजयासाठी अपेक्षेप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाला (Team India) पाच कोटी रुपयांचा घसघशीत बोनस (Bonus) जाहीर केला आहे.

ही बातमी पण वाचा:- हा भारताच्या संघाच्या ऊर्जेचा आणि विजयाच्या उत्कट संकल्पाचा साक्षात्कार – नरेंद्र मोदी

खरं तर भारताला कमी लेखणाऱ्या आणि वारंवार शिवीगाळ करणाऱ्या ऑस्ट्रेलियन्सवरील या विजयाचे मोल पैशांमध्ये नाहीच; पण त्यांच्या कर्तबगारीची बीसीसीआयने लगेच दखल घेतली आहे.

पिता बनलेल्या आणि पितृत्व रजेवर पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतलेल्या विराट कोहलीनेसुद्धा लगेच प्रतिक्रिया देताना म्हटलेय, ‘ व्हाट ए विन! यस्स!! अॕडिलेडनंतर आमच्यावर शंका घेणाऱ्या सर्वांना आम्ही दखल घेण्यास भाग पाडले आहे. अफलातून कामगिरी तर आहेच; पण जो निर्धार आणि जी जिद्द आम्ही दाखवली त्याला तोड नाही. वेल डन टू ऑल दी बॉईज अँड दी मॅनेजमेंट! या ऐतिहासिक कामगिरीचा आनंद घ्या …चीअर्स!

सचिन तेंडुलकरनेही म्हटलेय की प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला त्या त्या वेळी आम्ही जिद्दीने लढण्यास उभे राहिलो. निष्काळजी नाही तर निडर क्रिकेट खेळताना आम्ही विश्वासाच्या सर्व मर्यादा मोडत अविश्वसनीय कामगिरी केली. दुखापती व अनिश्चिततेला आम्ही संयम आणि विश्वासाने उत्तर दिले. हा भारताच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक आहे. काँग्रेटस् इंडिया!!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER