मुंबई एकदिवसीय सामना; ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय

India-vs-Australia-1st-odi-match Australia won-by-10-wickets

मुंबई : तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला. वानखेडे स्टेडियमवर आधी फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियापुढे अवघे २५६ धावांचे आव्हान ठेवले, ते ऑस्ट्रेलियाने ३७.४ षटकांतच पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक ७४ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मा, शिखर धवन आणि के. एल. राहुल या तिघांनाही संधी दिली होती. राहुलने ४७ धावा केल्या. इतर फलंदाज लवकर बाद झालेत.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर (१२८) आणि ऑरॉन फिंच (११०) या सलामीच्या जोडीने सतर्क ठोकले. ३० चौकार आणि ५ षटकार ठोकून ३७.४ षटकांत विजयाचे लक्ष्य गाठले.

एमसीसी म्हणते, कसोटी सामने पाच दिवसांचेच व्हावेत