इंडिया टुडेचा राजदीप सरदेसाईंना दणका, ऑफ एअरसह एक महिन्याचा पगारही कापला

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (Rajdeep Sardesai) यांनी 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचाराबद्दल ट्विट केले होते. या ट्विटमुळे राजदीप याना दोन आठवड्यांसाठी ऑफ एअर केले असून त्यांचा एक महिन्याचा पगारही कापण्यात आला आहे.

26 जानेवारी रोजी आंदोलक शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर परेड काढली होती. यादरम्यान दिल्लीमध्ये हिंसाचारही झाला. या हिंसाचारात त्यांचे 300 सैनिक जखमी झाले असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. आंदोलनावेळी एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. तथापि, त्या शेतकऱ्याचा मृत्यू कश्यामुळे झाला याची माहिती नसतांनाही राजदीप सरदेसाई यांनी ट्वीट केले होते. आयटीओ जवळ पोलिस गोळीबारात शेतकरी नवनीत सिंह यांचा मृत्यू झाला, असे ट्विट त्यांनी केले होते. या ट्विटमुळे इंडिया टुडे समूहाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना दोन आठवड्यांसाठी ऑफ एअर केले आणि एक महिन्याचा पगारही कापण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, याबाबत इंडिया टुडे या ग्रुपने याबाबत माहिती देताना म्हटले की, हा आमच्या आचारसहिंतेचा भाग आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER