भारतात होणार २०२३ ची विश्वचषक हॉकी स्पर्धा

२०२३ च्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे यजमानपद भारताला देण्याचा निर्णय आतंरराष्टÑीय हॉकी महासंघाने शुक्रवारी जाहीर केला. १३ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान ही स्पर्धा भारतात होईल.

महिलांच्या २०२२च्या विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद स्पेन व नेदरलँडला संयुक्तपणे देण्यात आले आहे. १ ते १७ जुलै २०२२ दरम्यान ही स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धांसाठी सामन्यांची ठिकाणे यजमान देश लवकरच जाहीर करतील.

ही बातमी पण वाचा : रोहित ठरलाय षटकारांचा बादशहा

या स्पर्धांसाठी यजमान संघ आपोआप पात्र ठरतील तर पाच खंडाच्या स्पर्धांचे विजेते संघसुद्धा पात्र ठरतील. उर्वरीत १० संघ पात्रता फेरीतून स्थान मिळवतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. २०१८ ची विश्वचषक हॉकीे स्पर्धा भारतातील भुवनेश्वर येथे खेळली गेली होती आणि त्यात बेल्जियमचा संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला होता.