आता कोविशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर भारताला तिसरी कोवोवॅक्स लस मिळणार : पूनावाला

Adar Poonawala

पुणे : नोवावॅक्स या अमेरिकेतील लसनिर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीकडून विकसित करण्यात आलेल्या ‘कोवोवॅक्स’ या कोरोना प्रतिबंधक लसीची मानवी चाचणी कोरोनावर प्रभावी आढळून आली आहे. त्यामुळे आमची भागीदारी असलेली ही लस येत्या जून महिन्यात भारतात उपलब्ध होऊ शकते, असे ट्विट सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला यांनी केले आहे.

शनिवारी आदर यांनी एक नवीन ट्विट करून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला. यामुळे आता कोविशिल्ड, कोव्हॅक्सिननंतर भारताला तिसरी कोवोवॅक्स ही लस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.नोवावॅक्स कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीचा फॉर्म्युला विकसित केला आहे. या लसीच्या यूकेमध्ये तीन मानवी चाचण्या झाल्या असून त्यामध्ये ते प्रभावी ठरले आहे. यापैकी तिसरी चाचणी ही १८ ते ८४ वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर झाली असून त्यांच्यामध्ये या लसीची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी आढळून आली आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटनमधील नवीन कोरोना विषाणूवर ही लस ८५ टक्के परिणामकारक आढळलेली आहे. या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येणार असून या लसीची चाचणी भारतात करण्यात यावी यासाठी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER