भारताला मिळणार घातक F-15EX फायटर विमाने

India to get lethal F-15EX fighter jets

अमेरिकन सरकारकडून आम्हाला F-15EX फायटर विमान इंडियन एअर फोर्सला (Indian Air Force) विकण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती बोइंगकडून गुरुवारी देण्यात आली. बोइंग ही अमेरिकेतील आघाडीची विमान उत्पादक कंपनी आहे व या कंपनीची काही विमाने भारतीय वायुसेना वापरते आहे.

“F-15EX च्या रूपाने IAF ला सुसज्ज आणि बहुउद्देशीय फायटर विमान भारताला मिळेल. शस्त्रास्त्र वाहून नेणे आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हे विमान अद्वितीय आहे.” असे बोइंग डिफेन्स अँड स्पेस इन इंडिया फायटर सेल्सचे प्रमुख अंकुर कांगलेकर यांनी सांगितले. “F-15EX विमानांसाठी बोइंगला अमेरिकन सरकारकडून मार्केटिंगचा परवाना मिळाल्याने भारताला विमानांचा पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

F-15EX हे अत्याधुनिक फायटर विमान आहे. हे बहुउद्देशीय फायटर विमान सर्व प्रकारच्या वातावरणात व दिवस-रात्री मोहिमा पार पाडण्यासाठी सक्षम आहे. ” असे अंकुर कांगलेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

भारत आणि अमेरिकेमध्ये मध्यंतरी ऐतिहासिक ‘बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अ‍ॅग्रीमेंट’ म्हणजे ‘BECA’ करार झाला होता. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून काही महत्त्वाची फायटर विमाने मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

मल्टीरोल म्हणजे बहुउद्देशीय एकाच वेळी वेगवेगळी काम करू  शकणारं फायटर विमान. F-15E ही F-15 विमानाची पुढची आवृत्ती आहे. १९७२ साली F-15 फायटर विमानाने पहिले उड्डाण केले होते. F-15E आणि F-15 ही दोन्ही विमाने अमेरिका आणि त्यांच्या मित्र देशांच्या हवाई दलाच्या ताफ्यात अजूनही आहेत. सौदी अरेबिया आणि कतार या आखातामधील दोन देशांकडे F-15EX विमाने आहेत. “या वर्गातील कुठल्याही फायटर विमानांपेक्षा F-15EX विमानांचा पल्ला आणि जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. ” असे बोइंगने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER