भारत – पाक हॉकी संघ 13 मार्चला भिडणार

भारत - पाक हॉकी संघ 13 मार्चला भिडणार

खेळाच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत (India) – पाकिस्तान (Pakistan).आमने सामने येणार आहेत. हॉकीच्या (Hockey) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी (Asian Champions Trophy) स्पर्धेत 13 मार्च 2021 ला ही झुंज होणार आहे. ढाका येथे होणाऱ्या या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार भारतीय संघाचा पहिला सामना 11 मार्चला जपानविरुध्द होणार आहे. यासह भारतीय हाॕकी संघाच्या पुढील वर्षीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्ये भारतीय संघाने एफआयएत प्रो लीगमध्ये आॕस्ट्रेलियाविरुध्द सामना खेळला होता. त्यानंतर भारतीय संघाने एकही सामना खेळलेला नाही. 2021 मधील ही पहिली स्पर्धा भायतीय संघासाठी टोकियो आॕलिम्पिकच्या तयाaरीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.

11 मार्चला जपानशी सलामी सामन्यानंतर भारतीय संघाचा पुढचा सामना 12 रोजी यजमान बांग्लादेशशी होईल. त्यानंतर 13 रोजी पाकिस्तान, 15 रोजी मलेशिया आणि 16 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुध्द भारतीय संघाला खेळायचे आहे. उपांत्य सामने 18 रोजी आणि अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे.

या स्पर्धेनिमित्ताने भारतीय संघ जवळपास वर्षभराने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळेल त्यामुळे आॕलिम्पिकच्या आधी आपण कोणत्या पातळीवर आहोत याचा अंदाज आपल्या संघाला या स्पर्धेतून येईल असे मिडफिल्डर सुमीत याने म्हटले आहे.

भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2011, 16 आणि 18 अशी तीन वेळा जिंकली आहे तर 2012 मध्ये आपण उपविजेते होतो.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 चा कार्यक्रम

11 मार्च – भारत वि. जपान (दु. 3 वा.)
11 मार्च – बांगलादेश वि. मलेशिया (संध्या.5.30 वा)
11 मार्च – द. कोरिया वि. पाकिस्तान (रात्री 8 वा.)
12 मार्च – भारत वि. बांगलादेश (दु. 3 वा.)
12 मार्च – मलेशिया वि. पाकिस्तान ( संध्या. 5.30 वा.)
12 मार्च – जपान वि. कोरिया (रात्री 8 वा.)
13 मार्च – भारत वि. पाकिस्तान (दु. 3 वा.)
13 मार्च – मलेशिया वि. द. कोरिया ( संध्या 5.30 वा)
13 मार्च – बांग्लादेश वि. जपान (रात्री 8 वा.)
15 मार्च – भारत वि. मलेशिया (दु. 3 वा)
15 मार्च – द. कोरिया वि. बांग्लादेश ( संध्या 5.30 वा)
15 मार्च – पाकिस्तान वि. जपान ( रात्री 8 वा)
16 मार्च – भारत वि. द.कोरीया (दु. 3 वा)
16 मार्च -.जपान वि. मलेशिया (संध्या. 5.30 वा)
16 मार्च – पाकिस्तान वि. बांग्लादेश (रात्री 8 वा)
18 मार्च – पाचव्या/ सहाव्या स्थानाचा सामना (दु. 3 वा.)
18 मार्च – पहिला उपांत्य सामना (संध्या. 5.30 वा.)
18 मार्च – दुसरा उपांत्य सामना (रात्री 8 वा)
19 मार्च – तिसऱ्या व चौथ्या स्थानचा सामना (संध्या. 5.30 वा)
19 मार्च – अंतिम सामना (रात्री 8 वा.)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER