‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’, कंगनाचा प्रताप सरनाईकांना टोमणा

Kangana Ranaut & Pratap Sarnaik

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांचा घरात पाकिस्तानचे क्रेडिट कार्ड सापडले, अशी माहिती आहे. अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) हिने याबाबतचे एक ट्विट, रिट्विट करत ‘इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों’ असे म्हणत शिवसेनेला (Shivsena) व प्रताप सरनाईक यांना टोमणा मारला.

कंगनाने ट्विटरवर एका यूजरचे ट्विट रिट्विट केले व म्हणाली, ‘जेव्हा मी मुंबई ही पाकव्याप्त कश्मीरप्रमाणे वाटत आहे असे म्हटलं होते, तेव्हा मला धमकी दिली होती. भारतातील लोकांनो जे तुमच्यासाठी सर्व काही पणाला लावत आहेत आणि जे लोक तुमच्याकडून सगळ काही काढून घेत आहेत अशा लोकांना ओळखा. तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवता तेच तुमचे भविष्य ठरवतात. इंडिया पाकिस्तान ना बन जाए संभालो यारों.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER