भारताने ब्राझीलाही टाकले मागे : कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्ली : मागील तीन दिवसांपासून देशभरात उच्चांकी कोरोनाग्रस्तांची वाढ होत आहे. देशातील कोरोनाचे (Corona) थैमान नियंत्रणाबाहेर जात आहे. गेल्या चोवीस तासांत रुग्णसंख्येने नवा उच्चांक निर्माण केला. त्यात देशभरात 86 हजार 974 नवे रुग्ण आढळून आले. तर 1100 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येत भारत (India) जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ब्राझीलला (Brazil) मागे टाकले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, भारताची रुग्णसंख्या 41 लाख 7 हजार 376 वर पोहोचली असून, ब्राझीलची रुग्ण संख्या 40 लाख 92 हजार 936 एवढी आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 70 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना मुक्तांची संख्या 31 लाख 7 हजार झाली आहे. देशातील एकूण बाधितांची संख्या 40 लाख 23 हजार 230 झाली आहे. यापैकी 8 लाख 46 हजार 426 रुग्ण सक्रिय अवस्थेत आहेत. देशातील मृतांची एकूण संख्या 69 हजार 581 झाली आहे.

ही बातमी पण वाचा : कोल्हापुरात मास्क न वापरण्यावर ५ हजार दंड : आजपासून सुरुवात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER