‘इंडिया’ नाव इतिहासातजमा होणार? भारत किंवा हिंदुस्थान नावाची शिफारस; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी

Supreme Court

मुंबई : स्वातंत्र्यपुर्वकाळापासून इंडिया या शब्दाने भारताला संबोधित केले जाते. इंडिया आमि भारत अशा दोन नावांतून टीकाकार भारताच्या अनेक स्थितीवर अनेक मार्गाने टीका करत. पण आता इंडिया हे नाव इतिहासजमा हेण्याच्या मार्गावर आहे.

संविधानातून इंडिया हा शब्द वगळून फक्त भारत ठेवावा यासाठी मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. देश एक आहे तर नाव एक का नाही? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. इंडिया हा शब्द गुलामीची निशाणी आहे. त्यासाठी भारत अथवा हिंदुस्थान या शब्दाचा वापर व्हावा अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली आहे. घटनेतील कलम १ मध्ये सुधारणा करून इंडिया हा शब्द हटवावा असं याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. आत्ता कलम १ मध्ये म्हटलं आहे की, भारत म्हणजे इंडिया हा राज्यांचा संघ आहे. त्याऐवजी इंडिया हा शब्द काढून टाकावा आणि भारत किंवा हिंदुस्थान इतकाच ठेवावा, देशाला मूळ आणि अस्सल नावावरून भारत म्हणून ओळखले पाहिजे असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER