कोरोना संकटकाळात नरेंद्र मोदी पंतप्रधान हे भारताचे सुदैव : राजनाथ सिंह

india-lucky Modi is PM during the Corona crisis-Rajnath Singh

नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या संकटाच्या काळात भारत सुदैवी आहे. कोरोनाच्या संकटावर मात करू शकणारा नेता आज आपल्याजवळ आहे. पंतप्रधान मोदींचा योग्य विचार आणि वेळीच निर्णय घेतला नसता, तर परिस्थिती खूप वाईट असती, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. कोरोना व्हायरस हे मागच्या सहा वर्षांतील मोदी सरकारसमोरचं सर्वांत मोठं आव्हान आहे, असंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

ही बातमी पण वाचा:- सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींचे देशवासियांना पत्र 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात संरक्षण मंत्रालयाने वर्षभरात काय-काय साध्य केलं त्यावर बोलताना राजनाथ सिंह यांनी सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाचं उदहारण दिलं. सीडीएस या पदाची निर्मिती ही महत्त्वपूर्ण कामगिरी असल्याचे सांगितले .अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे काय स्थिती आहे ते आपण पाहू शकतो. लॉकडाऊनचा निर्णय धाडसी होता आणि तो योग्य वेळी घेण्यात आला, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी, सरकारने विचार न करता लॉकडाऊनचा निर्णय घेतला हा विरोधकांचा आरोप फेटाळून लावला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER