भारत रोबोटिक्स क्षेत्रातहू बनतोय आत्मनिर्भर, अर्श शहा या युवकाने केली किमया!

Maharashtra Today

भारात रोबोटीक (robotics) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरु आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञाना आत्मसात करण्यासाठी भारतात अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. यामुळं अनेकांना यश मिळालं. जागतिक सत्तरावर भारताची मान उंचावली. कोरोनाच्या (Corona) लाटेत अनेक दवाखान्यांमध्ये रोबोट्सनी रुग्णांना अन्न आणि औषधांची पुर्तता केल्याचं आपण पाहिलं. भारतात अनेक वर्षांपासून रोबोटीक्सवर काम सुरुये. यात एका २२ वर्षीय युवकानं उल्लेखनिय काम केलंय.

हरियाणाच्या पानिपतमध्ये राहणाऱ्या अर्श शाह (Arsh Shah) दिलबगी नावच्या विद्यार्थ्यांच अमेरिकेच्या ‘प्रिंसटन विद्यापीठ’ या विषयात शिक्षण सुरुये. विशेष गोष्ट म्हणजे वयाच्या १६ व्या वर्षी या विद्यार्थ्यानं बनवलेल्या यंत्रानं संपुर्ण जगाच्या केंद्रस्थानी भारताला ठेवलं होतं. त्यानं ‘एमियोट्रॉफिक लॅट्रल स्कलिरॉसिस’ सारख्या रोगामुळं स्वतःचा आवाज गमावलेल्या रुग्णांसाठी श्वासाच्या माध्यमातून बोलता येईल असं यंत्र बनवलं होतं. त्याच्या या प्रोजेक्टला ‘गुगल सायन्स फेअर अवॉर्ड २०१४’ मध्ये सामील करण्यात आलं होतं.

अर्शच्या यंत्राचं नाव ‘टॉक’ असं ठेवलं होतं. एम्योट्रोफिक लेटरल स्केलिरॉसिस या रोगाला तोंड देणाऱ्या नागिरकांसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. हा एक मेंदूसंबंधीतरोग आहे. मनक्यातील पेशीसुद्धा यामुळं प्रभावी होतात. या रोगाशी प्रतिकार करणाऱ्यांना बोलता येत नाही यासाठी श्वासांच्या अधारे बोलता येईल असं यंत्र विकसीत करण्याची त्याची इच्छा होती. टॉकचे डिझाईन खुप सोप्प आणि सरळ आहे. त्यावेळी जगातलं एकमेव असं उपकरण होतं जे श्वासाद्वारे भाषा बोलायचं.

यंत्र काम कसं करतं?

इतर उपकणांच्या विपरित टॉक उपयोगकर्त्यांना व्हिलचेअरपर्यंत सीमीत ठेवत नाही. यामध्ये अधिक अरामदायक आणि सुलभ यंत्रणा देण्यात आलीये. कोणत्याही वयोगटातील स्त्री अथवा पुरुष याचा वापर करु शकतात. प्रत्येक वयोगटातील स्त्री आणि पुरुषांचे आवाज यातून निघू शकतात. भाषा समजण्यासाठी मॅट्रिक्स मॅप शिकण्याची गरज नाहीये. दोन मोडमध्ये हे यंत्र काम करतं संवाद आणि नियंत्रण अशा दोन प्रकारात. वापरकर्ता डब्लू- म्हणजे वॉटर सारख्या आधीच फिट केलेली वाक्य वापरु शकतो किंवा संवाद मोडमध्ये सामान्य बोलीभाषेतली वाक्य एनकोड करुन बोलता येणं शक्य आहे.

जेव्हा हे यंत्र बाजारात आलं ते व्हा याची किंमत हजारो डॉलर्सच्या घरात होती. परंतू अर्शनं या यंत्राची किंमत फक्त १०० डॉलर्स ठेवली. सामान्य लोकांपर्यंत हे डिव्हाइस पोहचवणं त्याचं ध्येय होतं. पण काही अडचणींमुळं २०१५ साली त्याला यावरच काम थांबवावं लागलं.याच वर्षी त्यानं पेटंट फाइल केलं होतं. यानंतर पुढची पाचवर्ष अर्शनं अॅपल, ब्रिजवॉटर अशा प्रतिष्ठीत कंपन्यात काम केलं.

काही महिन्यांपुर्वी अर्शनं त्याच अ‌ॅप लॉंच केलं. हे एक बँकिंग अ‌ॅप असून या अ‌ॅपचा मुळ उद्देश बँकेतील व्यवहार आधीक सोप्पे बनवणं आहे. आजही बँक व्यवहार करताना मोठं शुल्क आकारलं जातं हे शुल्क असू नयेत यासाठी अर्श काम करतोय. लहान सहान व्यवसायांना सुद्धा आर्थिक व्यवहार करताना बँकांना ११ टक्के शुल्क अदा करावे लागते. हे शुल्क अत्यल्प कसं करता येईल यासाठी प्रयत्नात असल्याचं अर्श सांगतो.

रोबोटीक्सबद्दल काय आहे अर्शच मत?

रोबोटीक्सचा भारतात विचार केला तर हॉलीवूड सिनेमांमधील रोबोट्सची प्रतिमा आपल्या मनावर बिंबवली गेलीये. रोबोटीक्सचं क्षेत्र इतक्या पुरतं मर्यादित नसल्याचं अर्श सांगतो. काही दवाखान्यात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यापासून रस्त्यांवर भोजन वितरीत करण्यापर्यंत सर्व कामं रोबोट करु शकतो. भारतासारख्या विकसनशील देशात रोबोटीक्स रुजलं तर यामुळं विकासाचा वेग अनेक पटीनं वाढू शकतो. असं अर्शचं मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button