तासभर लांबलेल्या खेळाने संथ गोलंदाजी पुन्हा चर्चेत

Adam Zampa

भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया Australia) दरम्यानचा पहिला वनडे सामना शुक्रवारी एकतर्फी झाला; पण हा सामना नियोजित वेळेपेक्षा एक तास जादा वेळ चालला. त्यामुळे संथ गोलंदाजीचा  (Slow Overrate) विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यानंतर या सामन्यात ५४ धावांत ४ बळी मिळवून सर्वांत यशस्वी ठरलेला फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाने (Adam Zampa) हा कंटाळवाणा प्रकार क्रिकेटसाठी मारक असल्याचे म्हटले आहे.जेसन गिलेस्पी व शेन वॉर्न यांनीसुद्धा  आयसीसीने याबाबत काही तरी उपाय करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

शेन वॉर्नने समालोचन करताना म्हटले की, सर्वच प्रकारच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी संथ होत आहे. जेसन गिलैस्पीनेही याबाबत दंड करायची मागणी केली आहे. सिडनीत शुक्रवारी तासभर सामना लांबल्याने शहरातील कर्फ्युबाबत आयोजकांची चिंता वाढली होती. प्रेक्षकही चलबिचल झाले होते. सामनावीर स्टिव्ह  स्मिथनेही म्हटलेय की, वाटत होते की पूर्ण दिवसभरच सामना चाललाय. मी मैदानावर सर्वाधिक काळ राहिलेली ही ५० षटके होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संथ गोलंदाजीबाबत नियमांत बदल केला आहे.

आता संथ गोलंदाजीसाठी कर्णधारांना डीमेरिट पॉइंटची शिक्षा होत नाही.आता संथ गोलंदाजीसाठी सामनाधिकाऱ्यांकडे संपूर्ण संघाला दंड करायचे अधिकार आहेत. या वर्षाच्या आरंभी भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यावर सलग तीन सामन्यांत असा भुर्दंड  पडला होता. निदर्शकांच्या घुसखोरीने काही काळ खेळ थांबला होता; पण तासभर खेळ लांबण्याएवढा तो व्यत्यय नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER