नववर्षाचे पहिले आव्हान भारतीय संघासाठी महाकठीण

Team India

२०२० ला भारतीय क्रिकेट संघाने मेलबोर्न (Melbourne Test) कसोटीतील संस्मरणीय विजयाने निरोप दिला आहे. आता २०२१ ची सुरुवात त्यांच्यासाठी कशी असेल याची उत्सुकता आहे. २०२१ चे पहिले आव्हान भारतासमोर (India Vs australia) असेल ते ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकायचे आणि दुसरे आव्हान असेल ते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान राखण्याचे…या दोन्ही गोष्टींसाठी अजिंक्य रहाणेच्या संघासमोरचा मार्ग खडतर आहे; कारण भारताचे पुढचे दोन्ही सामने सिडनी (Sydney) व ब्रिस्बेन (Brisbane) अशा पाहुण्या संघांना त्रासदायक ठरणाऱ्या मैदानावर आहेत.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला यापैकी किमान एक सामना जिंकावा लागणार आहे आणि दुसरा अनिर्णीत राखावा लागणार आहे. सध्या १-१ अशी बरोबरीत असलेली ही मालिका जो संघ जिंकेल तो विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहचणार आहे. जर मालिका बरोबरीत राहिली तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी राहील. सिडनीत भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान १२ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी फक्त एकच भारताने जिंकला आहे आणि पाच गमावले आहेत. सहा अनिर्णीत राहिले.

१९७८ पासून या मैदानावर भारताला यश मिळालेले नाही. त्यावेळी गुंडप्पा विश्वनाथ आणि प्रसन्ना, बेदी व चंद्रशेखरच्या योगदानाने आपण यश मिळवले होते. ब्रिस्बेनला तर भारताने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. पाच पराभव आणि एक अनिर्णीत अशी आपली तेथील कामगिरी आहे. त्यामुळे रहाणेच्या टीम इंडियासमोर नववर्षात कामगिरी फार कठीण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER