पहिल्या महायुद्धामुळं भारताला मिळाला म्हैसुर साबण

Mysore Sandal Soap

सर्वाना मोहून घेण्याचा चंदनाचा गुण आहे. भारतात मिळणाऱ्या चंदनानं संपूर्ण जगाला वेड लावलंय. चंदनाचा सुवास भारताच्या इतिहासाशी जोडला गेलाय. म्हणूनच शतकं उलटल्यानंतरही चंदनापासून बनलेला ‘म्हैसूर चंदन साबण’ भारतीयांच्या मनात घर करुन आहे.

चला तर मग जाणून घेवूयात भारतात सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या म्हैसूर चंदन साबणाची गोष्ट.

या साबणाचा इतिहास जुडलाय एका राजघराण्याशी . मे १९१६ला तत्कालिन राजा कृष्णराजा वोडियार चौथा आणि त्याचा वजिर मोक्षगुंडम यांनी चंदनाच्या लाकडातून तेल काढण्याचा कारखाना काढला. यानंतर पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली त्यावेळी म्हैसूरमध्ये चंदनाचं उत्पन्न सर्वाधिक व्हायचं. चंदनाचे ढिगारे पडून होते.

याच्या दोन वर्षानंतर महाराजाला चंदन तेलापासून साबण बनवण्याची मशिन भेट मिळाली. याचा वापर प्रजेसाठी साबण बनवण्यासाठी केला जावा अशी त्याची इच्छा होती. त्याने वजिराला बोलवून ही गोष्ट कानावर घातली. काही महिन्यानंतर चंदनाच्या तेलापासून साबण बनवण्याचा कारखाना तिथं उभा राहिला.

प्रत्येक काम कुशलतेने करणारे विश्वेश्वरैय्यांना असा साबण बनावायचा होता जो गुणवत्तेत चांगला असेल आणि सामान्यांच्या खिशाला परवडणाराही. यासाठी त्यांनी मुंबईतून विशेषज्ञ बनवले होते. भारतीय विज्ञान संस्था (आय आय एस सी) मध्ये साबण बनवण्याच्या प्रयोगाची व्यवस्था करण्यात आली. मजेदार गोष्ट ही होती की या संस्थेची निर्मिती सुद्धा १९११ला म्हैसुरचेच दिवाण के. शेषाद्री अय्यरच्या प्रयत्नाने झाली होती.

साबण बनवण्यासाठी त्याच्या उद्योगाचा विकास करणं गरजेच होतं. यासाठी प्रतिभाशाली युवकांना केमिस्ट सोसले गरलापुरी शास्त्रींना इंग्लंडला पाठवलं. त्यासाठी त्यांनी साबण बनवण्याच पुर्ण ज्ञान मिळवलं. आजही गरलापुरींना ‘साबुन सास्त्री’ या नावाने ओळखलं जात. आवश्यक ती माहिती मिळवल्यानंतर शास्त्री लगेच म्हैसूरला परतले. बँगलोर जवळ आर सर्कल इथं साबण बनवण्याचा कारखाना स्थापित करण्यात आला.

त्याच वर्षी म्हैसूरच्या चंदन लाकडापासून तेल काढण्याचा कारखाना स्थापन केला. १९४४ला शिवमोगामध्ये नवा प्लांट उभा राहिला. हा साबण बघता बघता म्हैसूर संस्थानासोबत देशभरात लोकप्रिय झाला.

म्हैसूर चंदण साबणाच्या डब्यावर ‘श्रीगंधा तवरिनिंडा’ असा संदेश लिहला जायचा. याचा अर्थ ‘चंदनाच्या मातृगृहातून’ असा व्हायचा. या सुंगधी साबणाला पांढऱ्या मुलायम कागदात गुंडाळलं जायच.

यानंतर व्यापार वाढवण्यासाठी साबणाचा सुनियोजीत प्रचार झाला. चौका चौकात बॅनर लावले गेले. साबणाच्या खोक्यापासून ते काडेपेटीपर्यंत सगळ्याच ठिकाणी साबणाची जाहिरात व्हायला लागली. इतकच नाही कराचीत साबणाचा प्रचार करण्यासाठी जुलूस काढण्यात आला.

यामुळं साबणाची मागणी भारतासह दुसऱ्या देशात प्रचंड वाढली. इतकच नाही तर दुसऱ्या देशातले राजघराणी या साबणाला वापरू लागली.

१९९०ला भारतीय अर्थव्यवस्था संपूर्ण जगासाठी खुली करण्यात आली. यामुळं विक्रीला मोठा फटका बसला. कंपनी बंद होईल की काय अशी परिस्थीती निर्माण झाली. बोर्ड फॉर इंडस्ट्रीयल अँड फाइनेंशियल रिकन्स्ट्रक्शननं (बीआयएफआर) कंपनीला अर्थसहाय्य केलं. २००३ पर्यंत कंपनीनं सर्व कर्ज परतवले. साबणासोबतच अगरबत्ती, तेल, हँड वॉश, टेल्क पावडर इत्यादी उत्पादने बाजारात आणली.

२००६ला या म्हैसूर साबणाला भौगोलिक संकेत (जी आय) मानांकनाने सन्मानित करण्यात आलं. म्हणजेच चंदनाचा साबण कुणीही बनवू शकतं, कुणीही विकू शकतं पण म्हैसूर चंदन साबण असण्याचा दावा कुणीही करु शकत नाही.

यानंतर कामकाजात सुधार करण्यात आले. आज ही कंपनी जगातल्या सर्वश्रेष्ठ कंपन्यांशी मुकाबला करते. हा एकमेव असा साबण आहे जी १०० टक्के चंदणाच्या तेलापासून साबण बनवते. आज बाजारात शेकडो ब्रँडेड साबण आहेत पण तरीही म्हैसूर चंदण साबण आपली वेगळी ओळख राखून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER