भारताने भेट म्हणून भूतान आणि मालदीवला दिली कोरोनाची लस

India gave corona vaccine to Bhutan

दिल्ली :- उत्कृष्ट नियोजनाद्वारे भारताने कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवले आहे. लसनिर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर आहे. सर्व जग भारताकडे मदतीच्या आशेने पाहते आहे. जागतिक स्तरावरील जबाबदारीची जाणीव ठेवून भारताने भूतान आणि मालदीव या आपल्या शेजारी देशांना भेट स्वरूपात कोरोना प्रतिबंधक लस पाठवली आहे.

एएनआयच्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भूतानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute) बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे दीड लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे एक लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

ही बातमी पण वाचा : केंद्र सरकारने सर्वप्रथम मंत्र्यांनी लस घ्यायचा नियम ठरवला तर मी स्वत: त्यासाठी पुढाकार घेईन – आरोग्यमंत्री टोपे

भारत हा जगातील लसनिर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश आहे. आजवर भारताने जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. सध्या भारतात जगातील सर्वांत मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी भारतातील कंपन्यांनाकडे आगाऊ नोंदणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER